Wednesday, February 2, 2011

कविता संग्रह

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१|| पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर | ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२|| दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर | भू ण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३|| तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर | त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४|| -कविराज भूषण {जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात}
#############################################################
ह्या कविता माझ्या नाहीत .पण सगळ्यांना चांगला कविता संग्रह वाचायला मिळावा ही एकच इच्छा आहे .म्हणून हा खटाटोप . देश भक्ती/ सामाजिक समस्या व प्रबोधन #############################################################

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

िखशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

##############################################################

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

###################################################################

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

दरीदरीतिल वारे हिंदू
आकाशातिल तारे हिंदू,
इथली जमीन, माती हिंदू
सागर, सरिता गाती हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
नसानसांतुन झरतो हिंदू !

प्रत्येकाची भाषा हिंदू
जात, धर्म अभिलाषा हिंदू
तुकाराम अन कबीर हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

इथला हरेक मानव हिंदू
अवघी जनता अभिनव हिंदू,
झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !


शंभर कोटी ह्रदये हिंदू,
हजार कोटी स्वप्ने हिंदू,
असंख्य, अगणित ज्वलंत हिंदू
अखंड भारत, अनंत हिंदू !!!

############################################################

खूप जाहला रास दांडिया,

गरबा टिप-या नाद सोडु या,

वीरश्रीयुक्त हुंकार उठवूया,

विजयादशमी सार्थ करु या।

आज वाजू दे शंख चौघडा,

मर्दपणाने,शड्डू ठोकू या,

षन्ढपणा फेकून देऊनी,

पुरुषार्थाचा धडा गिरवू या।

पुरे शिष्टाई खोटया बाता,

शब्द बुडबुडे नकोच आता,

घ्या शस्त्रे ती पूजा करुनी,

प्रत्यक्ष क्रुतीचा मुहुर्त गाठा।

पेटू दे स्फुल्लिंग मनी या,

खवळू दे अन खुशाल रक्ता,

एक निश्चये एक दिलाने,

अन्यायाशी झुंजू आता।

मी दुबळा हे खोटे क्रंदन,

मीच मला घातले कुंपण,

सीमोल्लंघन ते करुया आपण,

विजयश्री अन आणू खेचून।

#############################################################

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्य श्यामलां मातरं .
शुभ्र ज्योत्स्न पुलकित यामिनीम
फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् .
सुखदां वरदां मातरम् .. वन्दे मातरम्

सप्त कोिट कन्ठ कलकल िननाद कराले
िद्वसप्त कोिट भुजैध्रुत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धािरणीं नमािम तािरणीम्
रिपुदलवािरणीं मातरम् .. वन्दे मातरम्

तुिम िवद्या तुिम धर्म, तुिम हृिद तुिम मर्म
त्वं िह प्राणाः शरीरे
बाहुते तुिम मा शिक्त,
हृदये तुिम मा भिक्त,
तोमारै प्रितमा गिड मंिदरे मंिदरे .. वन्दे मातरम्

त्वं िह दुर्गा दशप्रहरणधािरणी
कमला कमलदल िवहािरणी
वाणी िवद्यादाियनी, नमािम त्वाम्
नमािम कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम् .. वन्दे मातरम्

श्यामलां सरलां सुिस्मतां भूिषताम्
धरणीं भरणीं मातरम् .. वन्दे मातरम्

#############################################################

काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी सोडुन दिधला, खासा बहलोल पठाण? -१

पुनश्च अडवा,धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरीथ करुनी.
तोवर अमान्य असें अम्हांस,बघणे तव मुख फ़िरुनी. -२

शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती.
गळुन पडला खलिता खाली,नयनांत आसवे भरती -३

रक्त तापले,श्वासागणिक फ़ुलु लागली छाती.
मांड टाकली घोड्यावरती,उडु लागली माती. -४

सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी.
म्यानातुनी जणु वीज घेतली,ढाल घेतली पाठी. -५

पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६

अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण.
छातीवरती घाव झेलले,अखेर सुटले प्राण -७

सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले.
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८

बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात.
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, जाहली सप्तर्षि नभात. -९

###########################################################

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी...

एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात तरंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी...

आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी...

आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी
येथल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी...

येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतांत सादते मराठी...

येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी...

येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

###########################################################

परवा दादर स्टेशनवर
एक मित्र दिसला
मला तो खुप खचलेला वाटला
विचारपुस केल्यावर
लखलखत्या दिव्यांसमोरही
अचानक अंधार पसरला
तो म्हणाला, परवा
महालक्ष्मी ला चाललो होतो
बायकोला पोरासोबत लेडीज मध्ये चढ्वून
स्वतः जेन्ट्स मध्ये चढ्लो
अचानक मोठा स्फोट झाला
हसता खेळता माझा मुलगा
काळ्या धुराआड लपला,
मी आणि बायको ने
त्याचा शोध घेतला
लाल चिखलातुन त्याला
अक्षरशः खेचुन काढ्ला
जरा थकलेला दिसला म्हणून
बायकोच्या कुशीत विसावला
सुजलेले डोळे किलकिले करुन
मला व बायकोला म्हणाला-
देवबापाने माझी
आठवण काढली आहे,
बाबा मी पुढे जातो
पण
तुमची आठवण खुप येणार
रात्री झोपताना मला
गोष्ट कोण सांगणार?
शांतपणे डोळे मिटलेल्या माझ्या मुलाकडे बघुन
स्टेशनचा खांबन खांब द्रवला
भूकंपाने धरणी काय हादरेल-
असा स्टेशनचा वासान वासा कापला
पोराने पदर घट्ट धरला म्हणून
तीही सोबत गेली...
दोष नसताना द:खाचा डोंगर
हाताने उकरतो आहे
त्यांचा स्म्रुतीसागरातील
एकेक शिंपला
भरल्या डोळ्यांनी जपतो आहे...
अचानक मित्र समोरच्या गर्दीत
नाहीसा झाला
तोबा गर्दीतही तो
पुर्णपणे एकाकी वाटला....

############################################################

जब की नगाडा बज ही चुका है सरहद पर शैतान का,
नक्शे पर से नाम मिटादो पापी पाकीस्तान का ॥ध्रु॥
कभी इधरसे कभी उधरसे घुसता है गुर्राता है,
दल झेलम की मधु लहरोंको गन्दे पांव लगाता है।
कैसर पर बारूद छीडकता अन्गारे बरसाता है,
न्योता देता महाकाल को अपनी मौत बुलाता है॥
भुल गया है हरप हरप जब खुद ही पाक कुरान का..॥१॥..
नक्शे पर से...
बोल दीया है धावा फ़ीर तो शेरो कदम हटाओ मत,
तोपोंके प्रलयन्कर जबडे वापस तुम पलटाना मत।
सिद्धांतो की परीभाषा मे अपनेको उलझाना मत,
धुल उडादो पिंडीकी अब पल्भर दया दिखाना मत॥
फ़ीर कब ऐसा वक्त मिलेगा लहूके यह भुकतान का..॥२॥
अमन,अहिंसा ,पंचशील के सरगम कुच्छ दिन गाओ मत ,
भडक उठा है हर जर्रा तो भाडकी आग बुझाओ मत|
भरि फसल की तऱ्ह काट दो जिंदा एक बचाना मत,
लाख बार मर जाओ लेकीन मां का दुध लजाना मत||
हिंदू कुश पर गाढके आना झंडा हिन्म्दुस्थान का ||३||
खुलकर दोनो हाथ दिखाना संघानी तालावारो को ,
हथीयारो से उत्तर देना दुश्मन कि हुंकारोको |
छाट छाट कर मुंड काटना घुसापैठी हथीयारो के,
हमे भेट मे देना माथे जयचंदे गाद्दारो के||
गिन गिन के है बदला लेना जननी के अपमान का||४||

##################################################################

.ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

###########################################################

झेंडावंदन झाले, वन्दे मातरम झाले
आमचे देशप्रेम भरून आले

जिलबी झाली, दुपारची झोप झाली
आमची कुर्बानी पूर्ण झाली

झब्बा घातला, घातली कोल्हापूरी चप्पल
पण आमची जीन्स होती स्टाईल सिंबल

संध्याकाळी पिक्चर अन बाहेर डिनर
स्वातंत्राची आम्हाला केवढी ही कदर

दुसरया दिवशी सकाळी, पुन्हा तिच लाचारी
सहज दुर्लक्षितो आजूबाजूची बेकारी

गांधी मोठे, त्यांचे विचार थोर
पण प्रत्येकात दिसतो आम्हाला एक चोर

नितीमत्ता भोळेपण, लबाडी हीच हुशारी
वेशीवर टांगली आहेत मुल्ये बिचारी

I See,You Know भाषेत सुदधा नाही आम्ही स्वाभिमानी
ज्यांनी लुटले त्यांची तत्वे पाळतो अजुन ईमानी

जखमेवर तेल मागताहेत ते अश्वथामे
चला स्वातंत्र्यदिनी आठवू त्यांचे कारनामे

###########################################################

No comments:

Post a Comment